वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्सालवेस यांना अटक !
गिल्सन गोन्सालवेस (सहायक आयुक्त) विरार, ५ डिसेंबर २०२५ : विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेप्रकरणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्सालवेस यांना मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने गुरुवारी मध्यरात्री उशिरा अटक केली. या दुर्दैवी दुर्घटनेत १७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेतील कथित निष्काळजीपणाच्या आरोपावरून गोन्सालवेस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोन्सालवेस यांना आज दुपारी (शुक्रवारी) स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करण्यासाठी कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. एका उच्चपदस्थ महापालिका अधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे वसई-विरार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघात आणि चौकशीचे तपशील विरार पूर्वेकडील विजयनगर परिसरातील चार मजली रमाबाई अपार्टमेंटची इमारत २६ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सवाच्या दरम्यान कोसळली होती. ही इमारत अनधिकृत असून, त्यात सुमारे ५० फ्लॅट्स होते. बांधकामानंतर काही वर्षांतच ती धोकादायक झाली होती. या दुर्घटनेनंतर, पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या संवेदनशील प्रकरण...














.jpg)



